वीज कनेक्शन तोडण्याच्या आदेशाला मिळवून दिली स्टे
सावंतवाडी एस पी के कॉलेज नजिक असलेल्या गाळेधारकांना महावितरण विभागामार्फत वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश देण्यात आलेले होते. या विरोधात गाळेधारकांनी ॲड. अनिल निरवडेकर यांच्या मार्फत न्यायालयात दाद मागितली होती. या प्रकरणी सावंवाडी न्यायालयाने महावितरण विभागाच्या आदेशावर अंतरिम मनाई आदेश पारित करून या प्रकरणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत कोणत्याही गाळेधरकाचे वीज कनेक्शन खंडित करू नये असा आदेश दिला.
त्यामुळे सावंतवाडी न्यायालया मार्फत गाळेधारकांना न्याय मिळवून दिल्याबद्दल सर्व गाळेधारकांनी ॲड. निरवडेकर यांचे अभिनंदन करून आभार मानले.
