Headlines

मडुरा तिठा हनुमान मंदिरात उद्या विविध कार्यक्रम

‘वज्राघात’ दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन

⚡बांदा ता.०५-: मडुरा तिठा येथील श्री हनुमान मंदिरात गुरुवार ६ एप्रिल रोजी हनुमान जयंती सोहळा होणार आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
    
सकाळी श्रींची पूजाअर्चा व अभिषेक, सकाळी १० वाजता श्रीसत्यनारायण महापूजा, त्यानंतर आरती व तीर्थप्रसाद होईल. सायंकाळी ५ वा. स्थानिकांचे भजन व ७ वा. जय संतोषीमाता दशावतार मंडळाचा ‘वज्राघात’ हा नाट्यप्रयोग होईल. भाविकांनी सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री हनुमान मंदिर देवस्थान समिती रोणापाल मडुरा तिठा यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page