ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांचा इशारा;आपलं अपयश लपविण्यासाठी केसरकर यांची खटपट असल्याचा केला आरोप..
⚡सावंतवाडी ता.२९-: आठवडा बाजार प्रश्न गंभीर नसताना सुद्धा केसरकर हे उगाच बाजार हलविण्याचा निर्णय घेऊन कुठे तरी आपल अपयश लपवण्यासाठी खटपट करीत असल्याची टिका ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी आज येथे केली.
दरम्यान सध्याच्या ठिकाणी सुरू असेलेला आठवडा बाजार हा व्यापाऱ्यांच्या व नागरिकांच्या दृष्टीने योग्य असून त्यांनी देखील आमच्याकडे तशी भुमिका मांडली आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत बाजार आम्ही हलवू देणार नाही असा इशारा राऊळ यांनी यावेळी दिला आहे.
तसेच राऊळल पुढे म्हणाले दीपक केसरकर म्हणतात मी सावंतवाडी शहराचा विकास केला मग बाजाराचा प्रश्न अद्याप पर्यंत का सुटला नाही असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्यामुळे आता कुठेतरी आपलं अपयश झाकण्यासाठी ते आठवडा बाजाराचा विशेष चर्चेत आणून लोकांचं मन विचलित करण्याचे ते प्रयत्न करत असल्याचा आरोपी राऊळ यांनी यावेळी केला.
