आठवडा बाजार प्रश्नी एकत्र येण्याचे सोडून केसरकर व भाजप सत्तेसाठी लाचार…

रुपेश राऊळ; केसरकारांच्या भूमिकेबाबत आता भाजप गप्प का..?

⚡सावंतवाडी ता.२९-: राज्यातील सत्तेत एकमेकांसोबत असलेले भाजप आणि शिवसेना मात्र सावंतवाडी आठवडा बाजारा बाबत वेगवेगळी भूमिका घेताना दिसत आहेत एकीकडे भाजपचे माजी नगराध्यक्ष संजू परब जिल्हाध्यक्ष राजन तेली आठवडा बाजार मोती तलावा काठी व्हावा या भूमिकेवर ठाम असताना केसरकर मात्र आठवडा बाजार अन्यत्र हलवण्याचा प्रयत्न करीत आहे. ही गोष्ट दुर्दैवी असून या विरोधात भाजप गप्प का..? असा सवाल ही रुपेश राऊळ यांनी आज येथे उपस्थित केल आहे.

दरम्यान सत्तेत एकत्र असल्याने भाजपचे केसरकार यांच्याकडून अशा परस्पर विरोधी भूमिका घेतल्या जात असतील तर ते दुर्दैवी आहे. जनतेच्या प्रश्नावर एकत्र येण्याचे सोडून हे दोन्ही पक्ष सत्तेसाठी लाचार असल्याचे दिसत आहेत, मात्र आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असून जनतेची जी मागणी आहे त्याप्रमाणे आठवडा बाजार हा मोती तलाव काठी राहील यासाठी आम्ही प्रसंगी लढा देऊ असे राऊळ यावेळी सांगितले.

यावेळी शहरप्रमुख शैलेश गवंडळकर शब्बीर मणियार मायकल डिसोजा, चंद्रकांत कासार गुणाजी गावडे योगेश नाईक आधी उपस्थित होती

You cannot copy content of this page