चराठा पाणी टंचाई निवारणासाठी लवकरच निधी

मंत्री केसरकर यांचे उपसरपंच अमित परब यांना आश्वासन;रस्त्यासाठी २५ लाखांचा निधी दिल्याबद्दल केसरकर यांचे मानले आभार

सावंतवाडी ता.२९-: येथील चराठा गावासाठी आमदार दीपक केसरकर यांनी रस्त्याच्या कामांसाठी 25 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास आता दूर होणार असून यामुळे चराठा भाजप उपसरपंच अमित परब यांनी केसरकर यांचे आभार मानले आहेत. तर गेले काही दिवस चराठा गावात पाणीटंचाई निर्माण होत असल्याने अमित परब यांनी केसरकर यांची भेट घेऊन लक्ष वेधले. यावेळी लवकरच पाण्याकरिता निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन परब यांना यावेळी दिले.

You cannot copy content of this page