सोमवारी औषधांचा प्रश्न सुटेल…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण;वैद्यकीय अधीक्षकांमुळे उपजिल्हा रुग्णालयात औषध तुटवडा..

⚡सावंतवाडी ता.२६-: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील औषधांचा प्रश्न सोमवारी सोडवण्यात येईल असे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केसरी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. पत्रकारांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात औषधांचा तुटवडा भासत असल्याचे सांगितले. हा प्रश्न सोमवारी मार्गी लागेल असे चव्हाण यांनी सांगितले.

औषधांचा तुटवडा का भासतो आहे ? हा प्रश्न आहे. हा प्रश्न निर्माण व्हायला संबधित वैद्यकीय अधीक्षक जबाबदार आहेत. औषध पुरवठा संपण्याअगोदर त्याची मागणी अधीक्षकांनी केली पाहिजे होती. तहान लागल्यावर विहीर खोदणे चुकीचे आहे. औषध पुरवण्यासाठी आवश्यक फंड सीआर फंडातून करण्यास अनेक कंपन्या तयार आहेत. त्यामुळे असे प्रश्न का निर्माण होतात याच आश्चर्य वाटतं, असे चव्हाण म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, बंटी पुरोहित उपस्थित होते.

You cannot copy content of this page