मालवण दि प्रतिनिधी
मालवण नगरपालिका हद्दीतील ज्या मालमत्ताधारक व नळ कनेक्शनधारकांनी २०२२- २३ या आर्थिक वर्षामध्ये थकीत असलेली मालमत्ता कराची व पाणीपट्टीची रक्कम अद्याप जमा केलेली नाही, अशा सर्वांनी आपली रक्कम लवकरात लवकर जमा करावी. वेळीच रक्कम भरून होणारी कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन मालवण नगरपालिकेकडून करण्यात आले आहे.
