माझं नेतृत्व रोखण्याच सोडाच मला कोणी सल्लाही देऊ शकत नाही

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेलींची नाव न घेता शालेय शिक्षणमंत्र्यांना कोपरखेळी

⚡सावंतवाडी ता.१४- सावंतवाडी मतदारसंघात याअगोदर भाजपाचे प्राबल्य नसतानाही मला ५७ ते ५८ हजार मते पडली आहेत.त्यामुळे माझ नेतृत्व कोण रोखू शकत नाही आणि मला कोणी सल्लाही देऊ शकत नाही अशी कोपरखळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी नाव न घेता शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना मारली.

दरम्यान मी सुद्धा पक्ष बदलला मात्र मी कुठल्याही नेत्याला शिव्या दिल्या नाहीत परंतु दिपक केसरकरांनी जो जो पक्ष सोडला त्या त्या पक्षाच्या नेत्यांना शिव्या घालण्याचे काम केलंय ज्या नेत्यांची त्यांना गरज भासते त्या नेत्यांचा जयजयकार करण्याचे काम देखील केसरकर यांनी आतापर्यंत केले आहे .एकंदरीत त्यांचं हे स्वार्थी राजकारण पुन्हा एकदा जनतेसमोर उघड झालं असल्याची टीकाही राजन तेली यांनी यावेळी केली आहे.

You cannot copy content of this page