कणकवली विधानसभा मतदार संघात २,२१० कोटीचा विकास निधी

आम.नितेश राणे;ठाकरे सेनेकडील ग्रामपंचायतीच्या सरपचांनी आता विकास प्रक्रियेत यावे

⚡कणकवली ता.११-: राज्यात भाजप – शिवसेना युतीचे म्हणजेच शिंदे – फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर गेल्या आठ वर्षात करता जी कामे करता आली नाहीत ती या आठ महिन्यात करून दाखविली आहेत .कणकवली, देवगड आणि वैभववाडी मतदारसंघाच्या विकासासाठी राज्‍य शासनाने तब्‍बल २ हजार २१० कोटींचा निधी दिला आहे. त्‍यानुसार लवकरच टेंडर प्रक्रिया होऊन विकास कामं सुरू होतील. त्‍यामुळे आता ठाकरे सेनेकडे ज्‍या ग्रामपंचायती आहेत, त्‍या सरपचांनी जरूर विचार करावा. हे सरपंच आमच्याकडे आले तर त्‍या गावांचा विकास निश्‍चितपणे होईल. ती जबाबदारी आम्‍ही घेऊ अशी ग्‍वाही आम. नीतेश राणे यांनी दिली.

कणकवली येथील प्रहार भवनमध्ये आयोजीत पत्रकार परिषदेत आम.नितेश राणे बोलत होते. ते म्‍हणाले, राज्‍यात ठाकरे सरकार असताना मला त्‍या सरकारबरोबर संघर्ष करायला लागायचा. इथे उद्धव ठाकरे यांच्या विचारांचा पालकमंत्री असल्‍याने माझ्या मतदारसंघावर सातत्‍याने अन्याय होत रहायचा. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये देखील मतदारांनी माझ्यावर विश्‍वास ठेवला. त्‍यामुळेच राज्‍यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आल्‍यानंतर मी माझ्या मतदारसंघाला खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकलो आहे.

आम.नितेश राणे म्हणाले, सन २०२३ आणि २०२४ च्या बजेटमध्ये सार्वजनिक बांधकाम या हेडखाली या मतदारसंघासाठी २३८ कोटी आम्‍हाला मिळालेले आहेत. या २३८ कोटीच्या कामांची यादी प्रसार माध्यमांना देणार आहे. जेणेकरून आमच्या विरोधकांना कळेल की ही कामे आमच्या नेतृत्‍वामुळे मिळाली आहेत. आमच्या विरोधकांना नेहमीच दुसऱ्याच्या मुलांचं बारसं करण्याची सवय. आम्‍ही कामे आणणार हे नारळ फोडणार आणि कामे आम्‍हीच केली असे सांगणार सन २०२३-२४ या वर्षासाठी २३८ रूपये प्राप्त झाले. तर २०२२-२३ मध्ये १५० कोटी रूपयांचा निधी आला. तर नाबार्ड अंतर्गत १० कोटी मिळाले आहेत.

आम.नितेश राणे, कणकवली नगरपंचायत वर सातत्‍याने आमच्यावर अन्यायच व्हायचा. ठाकरे सरकार असताना तर अतीअन्याय झाला. पण आमचे सरकार आल्‍यानंतर कृत्रिम धबधबा प्रकल्‍पसाठी निधी मंजूर झाला आहे. या कृत्रीम धबधब्‍याचे लवकरच भूमिपूजन होईल. स्पोर्ट कॉम्प्लेक्‍सचेही काम पूर्ण होत आहे. रिंगरोड देखील मार्गी लागतोय. तसेच इतर असंख्य विकास कामं लवकरात लवकर पूर्ण होतील. नागरी सहाय्य योजना कणकवलीसाठी शासनाने साडे बारा कोटी रूपये दिले आहेत. तर जिल्‍हा वार्षिक पर्यटनसाठी १० कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे.आमदार राणे म्‍हणाले, देवगड नगरपंचायत मध्ये लोकांनी आम्‍हाला नाकारल. सध्या ठाकरे सेनेची सत्ता तेथे आहे. तरीही लोकांशी, जनतेशी माझी बांधीलकी आहे. तेथील जनतेवर अन्याय होता नये. तेथील नेतृत्‍व कमी पडले असले तरी आम्‍ही आमच्या नगरपंचायतीसाठी २ कोटी ७५ लाख रूपये आणले आहेत. तर नगरोत्थानसाठी ४ कोटी ३५ लाख प्राप्त झाले आहेत. वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीसाठी अडीच कोटी आणले आहेत. तर नगरोत्‍थानअंतर्गत १ कोटी ३० लाख निधी आला. जिल्‍हा वार्षिक योजना अंतर्गत पालकमंत्र्यांच्या माध्यमातून या कणकवली मतदारसंघसाठी २५ कोटी मिळाले. डोंगरी विकास निधीमधून आम्‍ही सुचविलेल्‍या कामांसाठी ३५० कोटी रूपयांचा निधी मिळाला आहे. तळेरे विजयदुर्ग रस्त्यासाठी २५० कोटी रूपये मिळाले आहेत. गगनबावडा तळेरे रस्ता मुख्य घाट रस्तासाठी त्‍याला २५० कोटी, देवगड निपाणी फोंडाघाट दाजीपूर रस्त्यासाठी ८६१ कोटी मिळाले आहेत. पंतप्रधान ग्रामसडक योजना ४२ कोटी िमळाले. मुख्यमंत्री ग्रामसडक सयोजना १६ कोटी मिळाले. २५-१५ योजनेसाठी ५ कोटी मिळाले. अल्‍पसंख्यांक योजनेसाठी १ कोटी, समाजकल्‍यासाठी १ कोटी, पाटबंधारे विभागासाठी छोटे बंधारे यासाठी ३२५ कोटी माझ्या मतदारसंघासाठी मिळाले आहेत
असे आम. नितेश राणे यांनी सांगितले.ही कामे लवकरच सुरू होतील. वर्क ऑर्डर निघतील पण कामाच्या दर्जाची जबाबदारी आमची असेल. नुसते पैसे आणणं महत्‍वाचे नाही. तर कामाचा दर्जा त्‍याच पद्धतीने व्हायला हवा यावर आमचे लक्ष असेल. ही कामे आम्‍ही आणि आमच्या सरकारने आणलेली आहेत. मी सांगितल्‍यामुळे जनतेसाठी मंजूर केली आहेत. असे ते म्हणाले.

You cannot copy content of this page