गुरुदास गवंडे; पोलिसांनी परप्रांतीयांची नोंद ठेवावी.
⚡बांदा ता.२३-: पोलीस गस्त घालत नसल्यामुळे रोनापाल, मडुरा, इन्सुली, आधी परिसरात चोरट्यांनी लक्ष केंद्रीत केले असल्याचा आरोप मनसेचे माजी तालुका अध्यक्ष गुरुराज गवंडे यांनी केला आहे. दरम्यान बांदा परिसरात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय लोक राहतात परंतु याची नोंद पोलीस स्थानकात नाही याबाबत देखील गवंडे यांनी नाराजी व्यक्त केली.
याबाबत त्यांनी प्रसिद्ध पत्रक दिले असून त्यात असे नमूद करण्यात आले की जिल्ह्यात सर्वाधिक पोलीस कर्मचारी हे बांदा पोलिस स्थानकामध्ये आहेत. मग चोरीचे प्रमाण कसे वाढते असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान मटका दारू जुगार आधी या परिसरात मोठ्या प्रमाणात चालू आहेत उपविभाग पोलीस अधिकारी हे निवडणुकीपुरतं गावात भेटी देतात परंतु त्यांचा पोलिस हद्दीमध्ये त्यांचा लक्ष नाही असा आरोपी त्यांनी यावेळी केला.
