बांद्यात माघी गणेशजयंती उत्साहात साजरी…

*💫बांदा दि.१५-:* माघी गणेश जयंतीची सोहळा बांदा येथे मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला. बांदा वाफोली मार्गावर गणेश नगर येथिल श्री गणेश मंदिर तसेच बांदा शहरातील श्री पिंपळेश्वर गणपती मंदिर येथे गणेश जयंतीचा प्रतिवार्षिक सोहळा थाटात साजरा झाला. बांदा श्री गणेश मंदिर वाफाेली राेड , बांदा येथे ” माघी गणेश जयंती उत्सवाचे” आयोजन करण्यात आले होते. त्यानिमीत्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले होते. मंदिरात पहाटे 5 वाजता काकड आरती, अभिषेक पुजा होऊन त्यानंतर श्री सत्यविनायक महापुजा झाली. दु.12 वा गणेश जन्म सोहऴा झाला. त्यानंतर महाप्रसादास आरंभ झाला. सायंकाळी भजन झाले तर रात्रो अष्टविनायक दशावतारी नाट्य मंडळ निरवडे प्रस्तुत “पावन झाली पुण्यभुमी” या पाैराणिक नाट्य प्रयाेगाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. बांदा येथिल श्री पिंपळेश्वर गणपती मंदिरातही श्री गणेश जयंती सोहऴ्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले होते. पहाटे पाच वाजता काकडआरती, अभिषेक व पुजा झाली. सकाळी 8.30 वाजता श्री गणेश पुजा व त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा करण्यात आली . दुपारी 1 वाजता महाआरती होऊन महाप्रसाद आरंभ झाला. सायंकाळी 4.30 वाजता सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम व 6 वाजता सायंआरती झाली. त्यानंतर चेंदवणकर गोेरे दशावतार नाट्यमंडळ ,कवठी – कुडाळ यांचा गौतम ऋषी गंगास्नान हा महान पौराणिक नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.

You cannot copy content of this page