कॅन्सर तपासणीसाठी मालवणात २२ रोजी होप एक्स्प्रेस…

*💫मालवण-:* वयवर्ष २२ ते ६५ वयोगटातील लोकांचे मुखाचे कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर याचे निदान करण्यासाठी दि. २२ मार्च राेजी रोटरी क्लब मालवणच्या वतीने होप एक्स्प्रेस मालवणमध्ये येत आहे. मालवण मधील लिमये हॉस्पिटलमध्ये सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत ही तपासणी चालू राहील. यामध्ये फक्त पूर्वनोंदणी झालेले पन्नास पेशंट्स तपासण्यात येतील. मॅमोग्राफी, पॅप स्मिअर तसेच तोंडातील कॅन्सर साठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व निदान केले जाईल. यामध्ये संशयित रुग्णांच्या पुढील तपासण्या व उपचार कोल्हापूर कॅन्सर सेंटर यांचेमार्फत करण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page