*नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी भाजी मंडई आणि व्यापारी संकुलाची केली पाहणी

डागडुजी बाबत मुख्याधिकारी याना केल्या सूचना; अधिकाऱ्यांना नगराध्यक्षांनी सुनावले खडेबोल*

*💫सावंतवाडी दि.१५-:* नगराध्यक्ष संजू परब यांनी आज संत गाडगेबाबा भाजी मंडई व इंदीरा गांधी व्यापारी संकुलची मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या सोबत पहाणी केली आहे. यावेळी मंडईतील डागडुजी बाबतच्या सुचना त्यांनी मुख्याधिकारी यांना दिल्या आहेत. तर काही बाबींवरून सीईओं समोरच अधिकाऱ्यांना नगराध्यक्षांनी खडेबोल सुनावले आहेत. यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, बंटी पुरोहित, पालिकेचे दीपक म्हापसेकर, परविन शेख, श्री. कुडपकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page