परुळे येथे येथे १७ फेब्रुवारीपासून रथसप्तमी उत्सव….

महाप्रसाद, हळदीकुंकू कार्यक्रम कोरोनामुळे रद्द

*💫सावंतवाडी दि.१५-:* परुळे येथील श्री देव आदिनारायण देवस्थान येथे १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत रथसप्तमी उत्सव २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी हा उत्सव संक्षिप्त स्वरूपाचा असणार आहे. दरवर्षी होणारे महाप्रसाद, हळदीकुंकू आदी मोठ्या प्रमाणात गर्दी होणारे कार्यक्रम कोरोनामुळे रद्द करण्यात आले आहे. शासनाची नियमावली व सोशल डिस्टन्स पाळून दर्शन देण्यात येणार आहे. यानिमित्त १७ रोजी सकाळी ७ वाजता पुण्याहवाचन, सकाळी ८ वाजल्यापासून लघुसौर (ब्रम्हवृंदाकरवी सौरयुक्त आवर्तने), सायंकाळी ५ वाजता शेळपी येथील युवा कितर्नकार ह. भ. प. कु. चिंतामणी जगन्नाथ सामंत यांचे हरिकीर्तन, सायंकाळी ७.३० वाजता श्रीं ची आरती, १८ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून लघुसौर, सायंकाळी ५ वाजता वेताळ बांबर्डे येथील कितर्नकार ह. भ. प. श्रीकृष्ण (भाऊ) रामचंद्र सामंत यांचे हरिकीर्तन, सायंकाळी ७.३० वाजता श्रीं ची आरती, १९ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून लघुसौर, दुपारी १२ वाजता तेजोनिधी भगवान श्री सुर्यनारायणांची रथाधिष्ठित महापूजा, दुपारी १ वाजता देवतांना महानैवेद्य, सायंकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत रामकृष्ण हरी संगीत विद्यालयाचे ऋषिकेश देसाई आणि सहकलाकारांचे गायन, सायंकाळी ७ वाजता श्रीं ची आरती, रात्री ७.३० ते ९ या वेळेत प. पू. नामदेव महाराज संगीत विद्यालयाचे बुवा आनंद मोर्ये यांचे भजन, रात्री ९ वाजता भागवत पुराण वाचन, रात्री ९.३० ते १०.३० या वेळेत रथाधिष्ठित भगवान श्री देव आदिनारायणांची सवाद्य पालखी प्रदक्षिणा, रात्री ११ ते १ वाजेपर्यंत सिंधुरत्न ह. भ. प. भाऊ नाईक बुवा वेतोरे यांचे कीर्तन, रात्री १ वाजता जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ आरोस यांचा दशावतारी नाट्यप्रयोग आदी कार्यक्रम होणार आहेत. या उत्सवात भाविकांनी शासनाच्या नियमांचे पालन करून सहभागी होऊन या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव आदिनारायण देवस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page