कुंभारमाठ येथे रस्ता कामाचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजन…

*💫मालवण दि.१५-:* आमदार वैभव नाईक व जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांच्या पाठपुराव्यातून कुंभारमाठ वार्ड १ येथील पाण्याची टाकी ते दिनकर वस्त कुंपण पर्यंतचा रस्ता २५-१५ निधीतून मंजूर झाला. या रस्त्याचे भूमिपूजन जेष्ठ ग्रामस्थ सुरेश टिकम यांच्या हस्ते आमदार वैभव नाईक व शिवसेना तालुकाप्रमुख जिप सदस्य हरी खोबरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सरपंच प्रमोद भोगावकर, उपतालुकप्रमुख गणेश कुडाळकर, विभाग प्रमुख प्रवीण लुडबे, प्रवीण रेवंडकर, प्रियांका रेवंडकर, किरण वाळके यासह शिवसेना पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. परिसरातील अन्य काही रस्ते खड्डेमय बनले आहेत. त्या रस्त्याचीही डागडुजी व्हावी. अशी मागणी ग्रामस्थांनी केली. या रस्त्यांची पाहणी आमदार नाईक यांनी केली. ग्रामस्थांना माहिती देताना सांगितले, काही रस्ते मंजूर झाले आहेत. त्यांचे काम लवकर सुरू होईल. तर अन्य रस्ते लवकर मंजूर करून घेतले जातील. असे आश्वासन आमदार नाईक यांनी दिले.

You cannot copy content of this page