*संत श्री सेवालाल महाराजांची जयंती सावंतवाडीत साजरी

*बंजारा समाजाच्या नेहमी राहू पाठीशी – संजू परब

देशाच्या स्वतंत्र लढ्यात बंजारा समाजाचा मोठा वाटा – राजन तेली*

*💫सावंतवाडी दि.१५-:* संत श्री सेवालाल महाराज यांचा २८२ वा जयंती उत्सव जिमखाना मैदान इथं पार पडला. बंजारा समाजाच्यावतीने सावंतवाडी येथे ही जयंती साजरी करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे, नगराध्यक्ष संजू परब, भाजप जिल्हा चिटणीस महेश सारंग, माजी आरोग्य सभापती अँड. परिमल नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बंजारा समाजाचा एकोपा बघुन आनंद झाला. भविष्यात ‌समाजाच्या पाठिशी राहण्याचा शब्द नगराध्यक्ष संजू परब यांनी बोलताना दिला आहे. सावंतवाडीत बंजारा समाज एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे याची कल्पना नव्हती, तुमच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी आम्ही नेहमी सोबत राहू असे आश्वासन तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिले आहे. दरम्यान, बंजारा समाज हा कष्टाळू समाज आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बंजारा समाजाचा मोठा वाटा होता. शिक्षणात मोठी ताकद असून, तुमच्या मुलांना शिक्षणाची कास धरायला लावा, आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असे मत भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी व्यक्त केले आहे.

You cannot copy content of this page