आचरा पारवाडीत ८ फेब्रुवारीपासून ‘त्रैवार्षिक हरिनाम सप्ताह’

⚡मालवण ता.०१-: इनामदार देव श्री रामेश्वर संस्थान कसबा यांचे आचरा पारवाडी येथील श्री ब्राह्मणदेव मंदिर येथे बुधवार ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते शनिवारी ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत त्रैवार्षिक हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.

८ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत रात्री १२ ते १ या वेळेत श्री ब्राह्मणदेव दिंडी मंडळ आचरे पारवाडी यांचा चित्ररथ दिंडी कार्यक्रम सादर होणार आहे. तर १२ फेब्रुवारी दुपारी ३ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, रात्री १० वाजता श्री देवी माऊली दशावतार नाट्यमंडळ इन्सुली यांचा ट्रिकसिनयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांसह भजन मंडळांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री ब्राम्हणदेव सांस्कृतिक विकास मंडळाचे अध्यक्ष मुकेश सावंत, सचिव अनिकेत मांजरेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page