मत्स्य महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी अतुल काळसेकर यांचे प्रतिपादन*
सावंतवाडी-: कोरोनामुळे देशात लॉक डाऊन केल्याने लोकांचे जीवन विस्कळीत झाले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सिंधू आत्मनिर्भर योजना सुरू करत त्यासाठी २० हजार कोटीची तरतूद केली आहे. याच माध्यमातून गोड्या पाण्यातील माशांपासून लोकांना कुठे तरी चालना मिळावी याच धर्तीवर आज सावंतवाडी मध्ये सिंधू आत्मनिर्भर योजनेच्या माध्यमातून मत्स्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामुळे लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल असे प्रतिपादन अतुल काळसेकर यांनी मत्स्य महोत्सवाचा उद्घाटन प्रसंगी बोलताना केले आहे.
