सावंतवाडी नगराध्यक्षांसह भाजपा पदाधिकाऱ्यांना तात्काळ अटक करा

सावंतवाडी शिवसेना पदाधिकाऱ्यांची पोलीस निरीक्षक यांच्याकडे मागणी; खासदारांचा प्रतिकात्मक पुतळा दहन प्रकरण

*💫सावंतवाडी दि.१२-:* शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या प्रतिमकात्मक पुतळ्याचे जोड्यांन झोडत सावंतवाडीत भाजपे नगराध्यक्ष संजू परब याच्यासह पदाधिकाऱ्यांनी प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. त्यामुळे शिवसेना सावंतवाडी पदाधिकारी अधिकच आक्रमक झाले असून त्यांनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांना सदर घटनेची माहिती पाचारण करत तात्काळ भाजपचे नगराध्यक्षसह भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी यावेळी केली आहे. तसेच शहरात कायदा सुव्यवस्था बिघडली की याला जबाबदार कोण असा सवाल सावंतवाडी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांना विचारला. तसेच नगराध्यक्ष संजू परब व त्या भाजपा पदाधिकाऱ्यांना अटक न केल्यास पुढे निर्माण होणाऱ्या परिस्थितीतीस आम्ही जबाबदार राहणार नाही, असा इशारा तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी पोलिसांना दिला आहे.

You cannot copy content of this page