कुसरवे येथे शेतीमाल विक्री केंद्राचा शुभारंभ!
*💫मालवण दि.१२-:* मालवण तालुका कृषी अधिकारी व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांचे वतीने कुसरवे येथे विकेल ते पिकेल अभियान अंतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्राचा शुभारंभ श्री.संजय चव्हाण यांच्या स्टॉल वर मालवण तहसीलदार अजय पाटणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कट्टा येथील अश्विन ढोलम यांच्या विक्री केंद्राचे शुभारंभ प स सदस्य श्री.विनोद आळवे यांच्या हस्ते तर नवरत्न महिला कृषी समुह गटाच्या विक्री केंद्राचा शुभारंभ प. स. सदस्य श्री.कमलाकर गावडे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास वराड गावचे सरपंच श्री.मिठबांवकर तसेच बहुसंख्य शेतकरी व मान्यवर व क्रुषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी श्री.धनंजय गावडे,श्री.पवनकुमार सौंगडे,श्री.आनंद धुरी,श्री.सुहास इंगळे,श्री.कदम.श्री.श्रीकांत कोठाळे,श्रीम.धोंगडे,श्रीम.साबळे,श्रीम.विध्या कुबल,श्रीम.मनिषा गिते,श्रीम.सरीता ठाकरे उपस्थित होते.
