Headlines

ओरोस येथे मुलांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न

सुरक्षित व असुरक्षित स्पर्शाबाबत केले सखोल मार्गदर्शन

⚡बांदा ता.२५-: राष्ट्रीय कन्या दीनानिम्मित कोकण कला व शिक्षण विकास संस्था, केंद्रीय समाज कल्याण बोर्ड अनुदानित महिला मंडळ कुडाळ संचलित कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्र कुडाळ व महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अनुदानित व महिला मंडळ कुडाळ संचलित महिला समुपदेशन केंद्र, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ओरोस येथे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओरोस बु. नंबर १ येथे मुलांसाठी सुरक्षित स्पर्श व असुरक्षित स्पर्श तसेच कायदेविषयक सखोल मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले.

आजकालची परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की मुलांना सुरक्षित स्पर्श व असुरक्षित स्पर्श यातील फरक समजावून सांगणे अत्यंत गरजेचे आहे. लहान मुलांवरील अत्याचाराची, लैंगिक शोषणाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक गुन्ह्यांची सुरवात असुरक्षित स्पर्शातून होते. या अनुषंगाने समुपदेशक करिष्मा परब यांनी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शन सत्रात शाळेतील एकूण १७३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी ‘कोकण कला व शिक्षण विकास’ संस्थेच्या वतीने प्रकल्प व्यवस्थापक अजिंक्य शिंदे, समुपदेशक समिर शिर्के, कुणाल चव्हाण, कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्र कुडाळच्या वतीने समुपदेशक करिष्मा परब, हरेश शेर्लेकर महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या वतीने समुपदेशक प्रियांका बाक्रे यांनी या शिबिरात मार्गदर्शन केले.
प्रशालेच्या मुख्याध्यापक श्रीमती मुंडले, शिक्षिका श्रीमती गवस, श्रीमती सावंत व श्रीमती घाडीगांवकर यांचे सहकार्य लाभले. शालेय विद्यार्थ्यांना यावेळी कोकण संस्थेच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले.

You cannot copy content of this page