⚡सावंतवाडी ता.२५-: तालुक्यात माघी गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सावंतवाडी नगरपालिकेच्या कुणकेरी येथील पाळणेकोंड धरणावरील गणेश मंदिरात तसेच शहरातील दैवज्ञ गणेश मंदिरात गणेश भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
सावंतवाडी तालुक्यात ठीक ठिकाणी माघी गणेश जयंती विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरी करण्यात आली दिवसभर अभिषेक महाप्रसाद भजन रात्र सांस्कृतिक कार्यक्रम आधी भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी विविध मंदिर कमिटी कडून करण्यात आली होती.
सावंतवाडी शहरातील श्री दैवज्ञ मंदिरात तसेच नगरपालिकेच्या कुणकेरी येथील पाळणेकोंड धरण परिसरात असलेल्या गणेश मंदिरात सकाळपासूनच गणेश भक्तांनी दर्शनासाठी गर्दी गेली होती. या ठिकाणी पालिका प्रशासनाकडून भक्तांसाठी सुलभ दर्शन व्यवस्था तसेच महाप्रसादाचे आयोजन केले होते. तर दिवसभर धार्मिक कार्यक्रम सुर होते.
