⚡सावंतवाडी ता.०८-: सार्वंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गणित संबोध परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे . या परीक्षेत इ . ५ वी तील ५ विद्यार्थी व इ. ८ वी तील
४ विद्यार्थी असे एकुण ०९ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले.
या परीक्षेत इ .५ वी तील कु . अल्फिया अझरूद्दीन नेसर्गी , कु . भूमी संतोष गवस, कु . सफवान सगीर शेख, कु . अफ्शा अब्दुलसमद शेख , कु . आरोही अशोक पवार , व ८
वीतील कु . असद मलिकजान नदाफ, कु . अथर्व प्रशांत निंबाळकर, कु . आयान अझरूद्दीन नेसर्गी, कु . सना शहानवाझ नेसर्गी इ . विद्यार्थी पुढील गणित प्राविण्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. या विद्यार्थांना प्रशालेतील शिक्षिका श्रीम. फिरदोस खॉजा व श्रीम. सना गनी यांनी मार्गदर्शन केले.
सावंतवाडी मर्कझी जमात , बॉम्बे संस्थेचे सर्व पदाधिकारी , प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालक -शिक्षक कार्यकारिणी समिती पदाधिकारी यांनी यशस्वी विद्याथ्यांचे अभिनंदन केले व पुढील गणित प्राविण्य परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

