मडुरा हायस्कूल मध्ये २८ जानेवारीला पुस्तक पेटी प्रदान कार्यक्रम

मोडक प्रतिष्ठान बांदा व ग्रंथ आपल्या दारी नाशिक यांचे सौजन्य

बांदा/प्रतिनिधी
मडुरा येथे न्यू इंग्लिश स्कूलच्या हॉलमध्ये शनिवार दिनांक २८ रोजी सकाळी १० वाजता डॉ. मोडक प्रतिष्ठान बांदा व ‘ग्रंथ आपल्या दारी’ नाशिक यांच्यामार्फत मडुरा हायस्कूलला विविध १०० पुस्तकांची पेटी प्रदान कार्यक्रम आणि रोणापाल (सावंतवाडी) येथील दया सागर छात्रालयच्या मासिक अन्नदानाची रक्कम देण्याचा कार्यक्रम होणार आहे.
त्यासाठी किशोर केसरकर (डॉ. मोडक प्रतिष्ठानचे संस्थापक) उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बांदा येथील प्रसिद्ध चार्टर्ड अकाऊंटंट चंद्रकांत सावंत हे उपस्थित असतील. त्याचप्रमाणे माजी मुख्याध्यापक व बांदा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहे. उपस्थित राहवे असे आवाहन सेवानिवृत्त शिक्षक अच्युत पिळणकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page