कविलकट्टा गावाच्या विकासासाठी ‘विशाल सेवा फाउंडेशन’ कटिबद्ध

भाजपचे युवा नेते विशाल परब : वर्धापनदिनानिमित्त आयोजित स्पर्धेचे उद्घाटन

⚡कुडाळ ता.२३-: ऐवढा मोठा आणी भव्य दिव्य कार्यक्रम बघून खूप आनंद झाला आहे.मी एक सर्वसामान्य माणूस आहे.आजच नियोजन हे सर्वात उत्कृष्ट आहे.साई जळवी ने जे उपक्रम हाती घेतलेत ते पूर्ण व्हावेत. मला तुम्ही जी साथ दिलीय ती अशीच ठेवा मी तुमची साथ आयुष्यात कधीच सोडणार नाही.कविलकट्टा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी आणी माझी विशाल सेवा फाउंडेशन ही संस्था कायमस्वरूपी कटिबद्ध आहे.मला साथ द्या देशात तुम्हाला नेण्याच काम मी करेन असे भावनिक आवाहन युवा उद्योजक,भाजपचे युवा नेते तथा विशाल सेवा फाउंडेशन चे सर्वेसर्वा विशाल परब यांनी केले.
कविलकट्टा गाव आयोजीत पंचवीस व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावरून विशाल परब बोलत होते.यावेळी व्यासपीठावर तरूण भारतचे संपादक शेखर सामंत,नगराध्यक्ष सौ.आफरीन करोल,माजी नगराध्यक्ष ओंकार तेली,उद्योजक संतोष सावंत,कुडाळ तालुका खरेदी विक्री संघाचे नुतन चेअरमन दिपक नारकर,कोकणसाद चे उपसंपादक प्राध्यापक रूपेश पाटील,नगरसेविका ज्योती जळवी,साईनाथ जळवी उपस्थित होते.

You cannot copy content of this page