⚡ओरोस ता २३-: भोगवे येथील हॉटेल कोकोशंभाला समोरील समुद्राकडील दगडी कुंपण जेसीबीच्या सहाय्याने पाडून नुकसान करून जमिनीत अतिक्रमण करून लॉन कटरची चोरी केल्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणारा संशयित आरोपी अशोक शिऊ राठोड रा.विजापुर सध्या वेंगुर्ला याची मे.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस जे भारुका यांनी १५ हजार रुपयाच्या सशर्त जामिनावर मुक्तता केली. संशयित आरोपीच्या वतीने ॲड विवेक मांडकुलकर तसेच ॲड प्रणाली मोरे, ॲड भुवनेश प्रभुखानोलकर, ॲड प्रज्ञा पाटील यांनी काम पाहिले.
लॉन कटरची चोरी केल्याप्रकरणी सशर्त जामीन मंजूर
