⚡मालवण ता.२१-: ‘ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र’ हा रक्तदान चळवळी मधील अग्रणी समूह २२ जानेवारी २०२३ रोजी आपल्या रक्तदान सेवाकार्याची जीवनदायी ५ वर्ष पूर्ण करत करत आहे. ६ व्या वर्षातील पदार्पणनिमित्त भव्य रक्तदान सोहळा तसेच आदर्श रक्तदाता व आदर्श सामाजिक संस्थाचा सन्मान सोहळा दि. २२ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत सच्चिदानंद रक्तपेढी, शास्त्री नगर हॉस्पिटल ,दुसरा माळा, डोंबिवली. (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आला आहे.
थॅलेसेमिया ग्रस्त मुलांची व इतर गरीब गरजू रुग्णांची रक्तासाठी होणारी धावपळ लक्ष्यात घेता या रक्तदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र, ग्लोबल मालवणी सामाजिक संस्था, सिंधुदुर्ग रेड बटालियन संघ, जनजागृती सेवा समिती संस्था महाराष्ट्र, श्री विश्वकर्मा पांचाळ,सुतार समाज डोंबिवली, युवा सुतार प्रतिष्ठान मुंबई, मालवणचो कट्टटो प्रतिष्ठान, माझा सिंधुदुर्ग, आम्ही मालवणी, सिंधुदुर्ग प्रतिष्ठान या संस्थांचा सहभाग असणार आहे. माहितीसाठी विजय पांचाळ- 8082461263 यांच्याशी संपर्क साधावा. रक्तदानाच्या पवित्र कार्यात सर्वानी सहभागी व्हावे, असे आवाहन “ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र” यांनी केले आहे.
