⚡बांदा ता.२१-: रेडी येथील मातोश्री पार्वती राऊत विद्यालयाच्या इंग्लिश माध्यमाच्या सहा विद्यार्थ्यांनी पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले. प्रशालेच्या गौतमी डुबळे, हास्या मातोंडकर, गायत्री गडेकर, भावेश मेघवाल, प्रांजल परब व तन्वी तांडेल या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प. म. राऊत, चिटणीस डॉ. विनय राऊत, मुख्य सल्लागार एम. पी. मेस्त्री, मुख्याध्यापिका सौ. गीता विल्सन, प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
शिष्यवृत्ती परीक्षेत मातोश्री पार्वती राऊत विद्यालयाचे यश
