मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमानिमित्त आयोजन
बांदा/प्रतिनिधी
येथील नट वाचनालयात बांदा येथे १४ ते २८ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणुन वाचनालयात धार्मिक ग्रंथाचे प्रदर्शन मांडण्यात आले. यावेळी नट वाचनालयाचे अध्यक्षीय एस. आर. सावंत यांच्या शुभ हस्ते दिपप्रज्वलाने उदघाटन करण्यात आले.
या कार्यक्रमात मान्यवर म्हणुन अनंत भाटे यानी आपले विचार मांंडताना मराठी भाषा हि सर्वात जुनी भाषा असुन आपल्या या माय भाषेच्या संवर्धनाची आवश्यकता असल्याचे सांगीतले. एस आर सावंत यानी बोलताना भाषा हे विचारांची देवाण घेवाण करण्याचे माध्यम असुन त्या भाषेचा इतीहास जाणुन घेणे गरजेचे आहे. मराठी भाषेच्या सवंर्धनात ग्रंथ महत्वाची भुमीका बजावत असल्याचे सांगीतले. महाबळेश्वर सामंत यानीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सचिव राकेश केसरकर, सहसचिव हेमंत मोर्ये, संचालक जगन्नाथ सातोसकर, प्रकाश पाणदरे, अंकुश मांजगावकर, शंकर नार्वेकर, निलेश मोरजकर, सौ. स्वप्निता सावंत, ग्रंथपाल सौ. प्रमिला मोरजकर-नाईक, सौ. अमिता परब, सूनिल नातू, ओंकार राऊळ आदी उपस्थित होते. आभार राकेश केसरकर यानी मानले.
