बांदा शहरातील प्रभाग क्रमांक तीन मधील जीर्ण वीज खांब बदला

ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर व रत्नाकर आगलावे यांनी वेधले लक्ष

⚡बांदा ता.१९-: बांदा शहरातील प्रभाग क्रमांक तीन मध्ये ठिकठिकाणी वीज खांब हे जीर्ण झाल्याने धोकादायक बनले आहेत. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी हे खांब तात्काळ बदलावेत अशी लेखी मागणी या प्रभागाचे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर व रत्नाकर आगलावे यांनी केली आहे.
यासंदर्भात महावितरणचे बांदा सहाय्यक अभियंता एस. आर. कोहळे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, या प्रभागात निमजगा, गडगेवाडी, येथे ठिकठिकाणी वीज खाब हे जुने असून ते जीर्ण झाले आहेत. याठिकाणी दाटीवाटीने वस्ती असून खांब कोसळल्यास एखादी मोठी दुर्घटना घडल्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी तात्काळ येथील वीज खांब बदलावेत.
अभियंता कोहळे यांनी वाड्यात सर्वेक्षण करून लवकरात लवकर जीर्ण वीज खांब बदलण्यात येतील असे आश्वासन दिले.

You cannot copy content of this page