⚡देवगड ता.१७-: तालुक्यातील प्रतिथयश साहित्यिक डॉ भा. वा. आठवले याना महाराष्ट्र ब्राम्हण मंडळ सिंधुदुर्ग यांच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र ब्राम्हण मंडळाच्या सिंधुदुर्ग येथील संमेलनात गौरविण्यात आले.
जीवन गौरव पुरस्कार मानपत्र,सन्मानचिन्ह,तसेच रोख रु ५०००/-(हजार)शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांना गौरविण्यात आले.या वेळी माजी आमदार ऍड अजित गोगटे,प्रकाश गोगटे,प्रसाद घाणेकर तसेच महाराष्ट्र ब्राम्हण मंडळ सिंधुदुर्गअध्यक्ष श्री चिपळूणकर ,देवगड ब्राम्हण मंडळ अध्यक्ष सतीश घाटे,वेंगुर्ला वेदविद्या संवर्धन मंडळ अध्यक्ष उदय बापट देवगड ब्राम्हण मंडळ श्री सोमण , पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते .
या निमित्ताने सौ रोहिणी आठवले यांचाही सुवासिनींनी ओटी भरून साडी देऊन यथोचित सन्मान केला.डॉ आठवले याना पुरस्कार मध्ये मिळालेली रु ५०००/-(हजार)रक्कम महाराष्ट्र ब्राम्हण मंडळ सिंधुदुर्ग याना देणगी स्वरूपात परत केली आहे.
डॉ भा.वा. आठवले याना जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झालेबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
