अनेकांचे करण्यात आले सत्कार
वेंगुर्ला ता.१७-: फुले, शाहू, आंबेडकर विचार मंच वेंगुर्लाची बैठक साई मंगल कार्यालयात अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकी दरम्यान, जिल्हा सत्र न्यायालयाचे अधिक्षक व मंचचे उपाध्यक्ष एन.पी.मठकर हे ३६ वर्षे ९ महिने न्यायालयीन सेवा करुन निवृत्त झाल्याबद्दल तसेच बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे प्राध्यापक व मंचचे कार्यकारिणीचे सदस्य प्रा.व्ही.पी.नंदगिरीकर यांना शिक्षक पुरोगामी आघाडीचा कोकणरत्न पुरस्कारा मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी उपाध्यक्ष प्रा.सुनिल भिसे, सचिव के.जी.गावडे, सदस्य लाडू जाधव, उदय भगत, विठ्ठल जाधव, श्यामसुंदर राय, गजानन जाधव, प्रदिप सावंत, समिर भगत, लाडू जाधव उपस्थित होते.
फोटोओळी – मंचच्या बैठकीवेळी एन.पी.मठकर व प्रा.व्ही.पी.नदगिरीकर यांचा सत्कार करण्यात आला.
