⚡वेंगुर्ला ता.१७-: गेली कित्येक वर्षे परबवाडा गावातील तलाठी पद रिक्त होते. त्यामुळे महसूल कामांसाठी ग्रामस्थांना उभादांडा येथे जावे लागत असे. याची कल्पना ग्रामस्थांनी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांना दिली. त्यांनी याबाबत प्रांताधिका-यांचे लक्ष वेधले. दर शुक्रवारी एक दिवस परबवाडा गावासाठी तलाठी मिळावा या मागणीला यश आले असून तलाठी आंदुर्लेकर यांची नियुक्तीही करण्यात आली.
परबवाडा सरपंच शमिका बांदेकर, उपसरपंच पपू परब, सदस्य हेमंत गावडे, संतोष सावंत, कार्तिकी पवार, अरुणा गवंडे, हळदणकर, स्वरा देसाई, मनवेल फर्नांडीस, ग्रामसेवक प्रविण नेमण, भाजपा जिल्हा सरचिटणीस बाळू देसाई, रवी परब, लवू सावंत, ग्रामपंचायत कर्मचारी राजा परब, सिद्धेश कापडोस्कर, प्रियांका किनळेकर यांनी नूतन तलाठी आंदुर्लेकर यांचे स्वागत केले.
फोटोओळी – नुतन तलाठी आंदुर्लेकर यांचे परबवाडा ग्रामपंचायतीतर्फे स्वागत करण्यात आले.
राजन तेली यांच्या शिष्टाईने परबवाडा ग्रा.पं.ला मिळाला तलाठी
