सहभागी होण्याचे शंकर पार्सेकर यांचे आवाहन
⚡कणकवली ता.१७-: खादी आणि ग्रामउद्योग आयोग सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालय भारत सरकार यांच्यावतीने गजानन नाईक बहुउद्देशीय केंद्र आगर रोड, डहाणू यांच्या सौजन्याने व्यावसायिक प्रशिक्षण सहयोगी लक्ष्यपूर्ती वेलफेअर फेडेरेशन (रजि.) स्वयंरोजगार मार्गदर्शन प्रशिक्षण जागरूकता शिबिर शनिवार २१ जानेवारी २०२३ दुपारी ३ वाजता शिरवल ग्रामपंचायत येथे आयोजित करण्यात आले आहे.
उत्पादन क्षेत्रासाठी ५० लाख आणि सेवा क्षेत्रासाठी २० लाखांपर्यंत कर्ज सुविधा. कर्ज सुविधांवर ३५% पर्यंत अनुदान.
पात्रता १८ वर्ष पेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती / सोसायटी नोंदणी अधिनियम १८६० अंतर्गत सहकारी संस्था / एनजीओ इत्यादी यांना स्वयंरोजगार मार्गदर्शन प्रशिक्षण जागरूकता शिबिराच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे.
स्वयंरोजगार मार्गदर्शन प्रशिक्षण जागरूकता शिबिरात सहभागी होणाऱ्यानी शिरवल सरपंच सरपंच सौ. गौरी वंजारे – (९७६५२२१८९२), उपसरपंच प्रवीण तांबे – (९४२२८१२२४१) यांच्याशी संपर्क साधवा व जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजक : शंकर पार्सेकर (९४२२९७५९०८) यांनी केले आहे.
