बनावट दागिने प्रकरणी अन्य दोन संशयित ताब्यात

⚡सावंतवाडी ता.१६-: बनावट दागिने बनवून बँकांची फसवणूक केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी कोल्हापूरात जाऊन अन्य दोन साथीदार यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी मुख्य सूत्रधार असलेल्या सोनारासह पळून गेलेल्या अन्य एका संशयिताला सावंतवाडी पोलिसांनी काल रात्री उशिरा कोल्हापुरात अटक केली. सागर उर्फ नरेंद्र नलवडे व सोनार अमोल पोतदार (दोघेही रा. कोल्हापूर), अशी त्यांची नावे आहेत. त्यांना अटक करून कुडाळ येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.

You cannot copy content of this page