मानवी जीवनात भूगोलाचे महत्व अनन्य साधारण-: डॉ एस ए ठाकूर

मालवण दि प्रतिनिधी

मानवी जीवनात भूगोलाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. आपण जगतो ते जग त्याचे स्वरूप त्याचप्रमाणे त्या जगताचे लोकजीवन याच ज्ञान हे भूगोलामुळे होते. अशा या भूगोल विषयाला शास्त्रीय ओळख प्राप्त करून देण्यामागे भूगोल महर्षी डॉ. सी. डी. देशमुख यांची भूमिका महत्त्वाची होती. म्हणून डॉ. सी. डी. देशमुख यांचा जन्मदिवस भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो असे प्रतिपादन डॉ. एस. ए. ठाकूर यांनी केले.

मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात भूगोल विभागाच्यावतीने भूगोल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांच्यासह प्राध्यापक वर्गाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रा. रवींद्र गावडे यांनी डॉ. एस, ए. ठाकूर व इतर प्राध्यापकांचे वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी डॉ. एस. ए. ठाकूर यांनी भूगोल दिवसाचे महत्त्व विशद केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला हा आपण फक्त ऐतिहासिक आहे असे समजतो परंतु तो उभारण्यासाठी महाराजांचा भौगोलिक दृष्टीकोन देखील तो उभारण्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे.

यावेळी प्रा. बी. एच. चौगुले, प्रा. डॉ. उज्वला सामंत, प्रा. के. के. राबते, प्रा. हंबीरराव चौगले, प्रा. बर्वे मॅडम, प्रा. एम. आर. खोत यांनी आपले विचार मांडून भूगोल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

भूगोल दिनानिमित्त भित्तीपत्रकांचे प्रदर्शन व प्रतिकृती यांचे प्रदर्शन मांडण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी ओंकार यादव याने केले तर आभार प्रा. ए. व्ही. जाधव यांनी मानले.

You cannot copy content of this page