भालचंद्र बाबांच्या जन्मोत्सवानिमित्त शिबिरात ११९ रक्तदात्यांचे रक्तदान

⚡कणकवली ता.१२-: परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ११९ व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त भालचंद्र महाराज संस्थान येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात ११९ जणांचे रक्तदान करण्याचा संकल्प आयोजकांच्या वतीने करण्यात आला होता.या शिबिराला रक्तदात्यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार विजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी भालचंद्र महाराज संस्थानाचे अध्यक्ष सुरेश कामत, डॉ. विद्याधर तायशेटे,
खजिनदार दादा नार्वेकर,राजाराम वारस्कर, अनंत सौदागर, विश्वस्त प्रसाद अंधारी, उमेश वाळके, ज्येष्ठ व्यापारी विजय पारकर,
ॲड. संजय राणे, गजानन उपरकर, बाळा सापळे, श्री.म्हसकर, श्रीरंग पारगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
रक्तदान हे श्रेष्ठदान असून प्रत्येकाने रक्तदान केले पाहिजे. रक्तदान शिबिरात तुम्ही केलेल्या रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. तसेच भालचंद्र महाराज
संस्थान धर्मिक व सांस्कृतिक क्षेत्रासह आरोग्य क्षेत्रातही काम करत असल्याचे अध्यक्ष सुरेश कामत यांनी सांगितले. भालचंद्र महाराज संस्थानच्यावतीने दरवर्षी
रक्तदान शिबिर घेण्यात येते. यंदा भालचंद्र महाराज यांच्या ११९ व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ११९ रक्तदात्यांनी रक्तदान करत
हे शिबिर यशस्वी केले.

You cannot copy content of this page