फोंडाघाट स्मशानभूमी पाण्याची केली सोय

फोंडाघाट सरपंच संजना आग्रे यांचा नवा आदर्श

⚡कणकवली ता.१२-: फोंडाघाट नूतन सरपंच सौ संजना संजय आग्रे यांनी फोंडाघाट गावातील प्रलंबीत असलेल्या अत्यावश्यक सुविधांमधील असणाऱ्या समस्या सोडवून एक नवा आदर्श घालून दिला.


    फोंडाघाटच्या नूतन सरपंच सौ. संजना आग्रे यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात फोंडाघाट ग्रा.पं.च्या सभागृहात पार पडला. यानंतर फोंडाघाटमधील नागरिकांसाठी अत्यंत अडचणीचा असणारा प्रश्न म्हणजे स्मशानभूमीतील अंत्यविधी लागणारे पाणी आणण्यासाठी करावी लागणारी धडपड ओळखून स्वखर्चाने फोंडाघाट स्मशानभूमी येथे उंच सिमेंटचा कठडा बांधून पाण्याचे कनेक्शन घेऊन त्यावर नवीन पाचशे लिटरची टाकी बसून पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली त्याचबरोबर अंत्यविधीसाठी लागणारी तुळशीची झाडे पांढऱ्या फुलांची झाडे तसेच अन्य झाडांची छोटी सी बाग तयार करून देण्यात आली.
    तसेच फोंडाघाट बस स्थानकाच्या आवारातील स्वच्छतागृहा वरील टाकीत नळाचे पाणी चढत नसल्याने येथील स्वच्छतागृह पूर्णपणे अस्वच्छ आणि खराब झाले होते याबाबत एसटी महामंडळाकडे वारंवार तक्रार करूनही या समस्येचे निवारण होत नव्हते म्हणून सरपंच सौ. संजना आग्रे यांनी स्वखर्चातून स्वच्छतागृहाच्या वरच्या टाकीत पाणी चढण्यासाठी एक इलेक्ट्रिक मोटर पंप खरेदी करून आज भेट म्हणून दिला
   तसेच फोंडाघाट हायस्कूलच्या पाचवी ते बारावी मधील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग उपलब्ध करून दिल्या
   दरम्यान अशाप्रकारे फोंडाघाटच्या नूतन सरपंच संजना आग्रे यांनी वाढदिवस साजरा करताना वैयक्तिक आनंदापेक्षा समाजातील समस्या सोडविण्यात आनंद मानत आपला वाढदिवस साजरा केल्याने फोंडा मधील सर्व ग्रामस्थांसमोर एक नवा आदर्श तयार केला.यावेळी बोलताना सरपंच संजना आग्रे यांनी आपण फोंडाघाट गावच्या सरपंच असून गावाचा विकास साधत असताना राजकीय पादत्राणे बाहेर ठेवून कोणताही भेदभाव न करता गावाचा सर्वांगीण विकास साधण्याचा आपला प्रयत्न असेल असे मत व्यक्त केले.

You cannot copy content of this page