⚡देवगड ता.१०-: तारामुंबरी नाका ते तारामुंबरी पूल या रस्त्याची दुर्दशा होऊन रस्त्यात खड्ड्याचे साम्राज्य पसरले होते या रस्त्याबाबत मनसे देवगड माजी पदाधिकारी यांनी आक्रमक पवित्रा घेऊन रास्ता रोको आंदोलन इशारा १० जाने वारी रोजी सा.बा.उपविभाग देवगड याना दिला होता .सा. बा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री सर्वगौड तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करून त्यांचे मार्गदर्शनाखाली सा.बा.उपविभाग देवगड यांनी या रस्त्यामधील खड्डे खडी डांबराने सुस्थितीत केले त्यामुळे मनसे माजी पदाधिकारी यांनी दिलेला रास्ता रोको आंदोलन स्थगित करून सा. बा. विभागाला धन्यवाद दिले आहेत
तसेच या रस्त्याच्या खडीकरण डांबरीकरण बाबत आवश्यक तो प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्या प्रस्तावाला मंजुरी मिळताच पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे लेखी पत्रात नमूद केले आहे.
