रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त
आरटीओ कार्यालयाचा पुढाकार
⚡बांदा ता.१०-: रविवार दिनांक १५ रोजी रस्ता सुरक्षा अभियान २०२३ अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) सिंधुदुर्ग तर्फे कुडाळ शहरामधे “वॉल्कथॉन” रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. याचा मुख्य उद्देश्य म्हणजे पादचारी यानी रस्त्यावर चालत असताना रस्त्याच्या उजव्या बाजुने चालावे जेणेकरून समोरून येणारे वाहन आपल्याला दिसेल व अपघात टाळता येईल.
यादिवशी सकाळी ठीक ७ वा शहरातील आरएसएन चौक इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून जनजागृतीस सहकार्य करावे असे आवाहन परिवहन कार्यालय सिंधुदुर्गतर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.
