रेकोबा हायस्कुलमध्ये विद्यार्थी मानसिक आरोग्य मार्गदर्शन

⚡मालवण ता.१०-: बॅ. नाथ पै सेवांगण संचालित कौटुंबिक सल्ला केंद्र, मालवण व ग्रामीण रुग्णालय, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंती निमित्त रेकोबा माध्यमिक विद्यालय वायरी, मालवण येथे शालेय विद्यार्थी मानसिक आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतींना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमास रेकोबा हायस्कूलच्या मुख्याध्यापक सौ. शुभदा शिंदोळकर, कौटुंबिक सल्ला केंद्राचे मनोजकुमार गिरकर, मालवण ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक उमेश पेडणेकर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी मनोजकुमार गिरकर म्हणाले, शरीराप्रमाणेच मनाचेही आरोग्य महत्वाचे असून त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. दैनंदिन शालेय जीवनात मुलांना अभ्यास, परीक्षा, स्पर्धा यांचा सामना करावा लागतो. तसेच ताणतणाव, चिंता, भीती, निराशा यांना कळत नकळत पणे सामोरे जावे लागते. परंतु या परिस्थितीमध्ये घाबरून न जाता त्याबद्दल शिक्षक पालकांशी बोलून यावर मार्ग काढता येणे शक्य आहे. सध्या बरीच मुले ही व्यसनाचा आधर घेत असल्याचे दिसून येते. या व्यसनापासून स्वतःला दूर ठेवणे गरजेचे आहे. तसेच विद्यार्थी वर्गाला काही समस्या असल्यास कौटुंबिक सल्ला केंद्राशी संपर्क साधावा ग्रामीण रुग्णालय, मालवण यांच्याकडून उपस्थित विद्यार्थ्यांना शालेय विद्यार्थी-मानसिक आरोग्य या पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.

You cannot copy content of this page