राष्ट्रवादीने शिवसेना ठाकरे गट संपविण्याचा विडा उचलला आहे

शिंदे गटाचे प्रवक्ते मंत्री केसरकर यांचा गंभीर आरोप

सावंतवाडी ता.०८-:

राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना उध्दव ठाकरे गट संपवण्याचा विडा उचलला आहे, असा आरोप मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. ते रविवारी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली.


मंत्री केसरकर म्हणाले,आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा पुढे घेऊन जाण्याचे काम सुरू केले आहे. म्हणूनच आम्ही भाजप सोबत युती केली आहे. गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकार च्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस च सर्वत्र वरचढ होत गेली आणि शिवसेना कुठेतरी संपत चालली होती.हे आम्हाला न पटल्यानेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला पण या निर्णयानंतर आम्ही पैसे घेतल्याचा आरोप केला मग पैसे आहेत म्हणून टाटा किंवा बिर्ला हे का मुख्यमंत्री झाले नाहीत असा सवाल मंत्री केसरकर यांनी केला.

You cannot copy content of this page