⚡देवगड ता.०९-: भाई जामसंडेकर आणि मित्रपरिवार तर्फे दि. १४ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी सात वाजता जामसंडे जाधव परिवार मामघाडी भटवाडी रोड येथे सुरेखा पुणेकर यांचा नटरंगी नार हा बहरदार कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमासाठी 75 88 38 17 69, 78 23 85 86 87 व 96 65 73 66 14 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ग्रुप साठी दहावी बारावी पदवीधर अशा मुला मुलींची निवड करण्यात येणार आहे तरी इच्छुकानी आपल्या बायोडाटा सह संजय हर्बल प्रोप्रायटर भाई जामसंडे येथे दि. ९जानेवारी २०२३ रोजी सकाळी नऊ वाजता उपस्थित राहावे.
तत्पूर्वी दिलेल्या फोनवर संपर्क साधावा. तसेच भाई जामसंडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक, सामाजिक, पत्रकारिता, महसूल विभाग आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना जीवनगौरव, सिंधू रत्न आदी पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे तरी उल्लेखनीय कार्य केल्याने आपल्या बायोडाटासह वरील दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
