लोककला दशावतार प्रश्नमंजुषा स्पर्धेत राजाराम धुरी यांचे यश

*💫वेंगुर्ले दि.०९-:* वेताळ प्रतिष्ठान तर्फे घेण्यात आलेल्या कोकणची लोककला दशावतार प्रश्नमंजुषा स्पर्धेत कोलगाव येथील राजाराम धुरी यांनी ४० पैकी ३९ गुण संपादन करून यश मिळवले आहे. दशावतारी कलेची लोकजागृती व्हावी या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन वेताळ प्रतिष्ठान तर्फे घेण्यात आली होती. या स्पर्धेत यश प्राप्त केल्याने त्यांना प्रतिष्ठान कडून ई प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. राजाराम धुरी हे दैनिक प्रहारचे पत्रकार असून, एक दशावतारी कलाप्रेमी म्हणून ही त्यांची ओळख आहे.

You cannot copy content of this page