सागरी सुरक्षा रक्षक यांच्या सहाय्याने मत्स्य विभागाची कारवाई
देवगड-: परराज्यातील पर्ससीन हायस्पीड टॉलरना सिंधुदुर्गात मच्छीमारी करायला बंदी असताना देखील आदेश डावलून सिंधुदुर्गात मच्छिमारी केली जाते. दोन दिवसापूर्वी कर्नाटक मलपी येथील हायस्पीड नौका देवगड मध्ये पकडली होती. त्यापाठोपाठ आज देखील कर्नाटक उडपी येथील हायस्पीड नौका देवगड तालुक्यात काळोशी गिर्ये खोल समुद्रात पकडण्यात आली. सागरी सुरक्षा रक्षक यांच्या सहकार्याने मत्स्य विभागामार्फत ही कारवाई करण्यात आली. शासनाचा बंदीचा आदेश डावलून परराज्यातील हाय स्पीड टॉलर देवगड येथील समुद्रात बेसुमार मच्छीमारी करत आहेत. त्यामुळे स्थानिक मच्छिमार याचा मोठा फटका बसत आहे. सोमवारी रात्री उशिरा मत्स्यविभागाला माहिती प्राप्त झाल्यानंतर मत्स्य विभागाचे मालवणकर व सागरी सुरक्षा रक्षक यांच्या सह खोल समुद्रात जात काळोशी गिर्ये येथील समुद्रात रात्रीही उशिरा हा टॉलर पकडण्यात आला.कोणतीही साधन नसताना देखील मत्स्य विभाग व सुरक्षारक्षकांनी ही परराज्यातील नौका पकडली मात्र त्यांचा पाठलाग इतर परराज्यातील बोटीने केला असे असून देखील सुखरूप त्यांनी हा टॉलर देवगड बंदरात आणत मत्स्य विभागामार्फत कारवाई करण्याचे काम सुरू केले.पकडण्यात आलेल्या या टॉलरवर वेगवेगळ्या वीस प्रजातीची मच्छी आढळली आहे. पकडलेल्या या टोलविरोधी मच्छीचा लिलाव करून हा सर्व लिलावाची रक्कम दंड स्वरूपात उभारण्यात येणार असल्याचे मत्स्य परवाना अधिकारी यांनी सांगितले.पकडण्यात आलेल्या टॉलर हा कर्नाटक राज्यातील उडपी येथील असून सुदर्शन असे टॉलर चे नाव आहे. शासनाच्या बंदीचा आदेश डाउनलोड सिंधुदुर्ग तील किनारपट्टीवर बेसुमार मच्छिमारी कर्नाटक परराज्यातील मच्छीमार पर्ससीन धारण करत आहे मात्र यांच्यावर कारवाई करण्यात शासन आपलेच काही रक्षक असल्याने हात आखडते घेत असल्याचा आरोप स्थानिक मच्छिमार संजय बांदेकर यांनी केला आहे. शासनाच्या या धोरणामुळे पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येताना दिसत आहे. सागरी सुरक्षारक्षकांना सहा महिन्याचा पगार नसून देखील हे मात्र आपले काम प्रामाणिकपणे करत असल्याचेही यावेळी बांदेकर यांनी सांगितले फोटो- कर्नाटक उडपी येथील अनधिकृत मासेमारी करताना पकडलेली हायस्पीड नौका
