सिंधुदुर्ग जिल्हा जुदो कराटे अकादमीच्या स्वच्छता मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद

*नरेंद्र डोंगर ते मारुती मंदिर अशी काल राबवण्यात आली होती स्वच्छता मोहीम

*💫सावंतवाडी,दि.०९-:* सिंधुदुर्ग जिल्हा जुदो कराटे आकीदो असोसिएशन संस्थेच्यावतीने काल येथील नरेंद्र डोंगर ते मारुती मंदिर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. संस्थेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. यावेळी नगरपालिकेचे नगरसेवक सुरेंद्र बांदेकर आणि स्वच्छता निरीक्षक रसिका नाडकर्णी या उपस्थित होत्या. संस्थेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या स्वच्छता मोहीम याबद्दल श्री बांदेकर आणि सौ नाडकर्णी यांनी मुलांचे पालक तसेच प्रशिक्षकांचे कौतुक केले. यावेळी नगरसेवक श्री बांदेकर यांनी आपले अनुभव तसेच गुरुचे महत्व उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना पटवून दिले. या कार्यक्रमाचे आयोजन जबाबदारी आणि शिस्तबद्ध नियोजन संस्थेचे सेन्साई वसंत जाधव, सहकारी प्रशिक्षक दिनेश जाधव, संदेश पंडित, सनी जाधव, योगेश बेळगावकर, वैष्णवी रासम, ऍड पूजा जाधव यांनी केले. तसेच यावेळी सर्व प्रशिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्वच्छता मोहिमेत प्रमाणे इतर सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत राबविण्यात येतात जुडो कराटे या सह सामाजिक एक कार्याची जाण विद्यार्थ्यांना असणे आवश्यक आहे. या भावनेतूनच हा स्वच्छता मोहीम यासारखे उपक्रम आम्ही राबविला अशी प्रतिक्रिया यावेळी संस्थेचे मुख्य प्रशिक्षक सेन्सॉय वसंत जाधव यांनी यावेळी दिली.

You cannot copy content of this page