⚡बांदा ता.२५-: विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस मधील इयत्ता नववीतील विद्यार्थिनी मयुरी महेश आरोसकर हिने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मैदानी स्पर्धेत सतरा वर्षे वयोगटातून पंधराशे मीटर धावणे या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
सातारा येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी तिची निवड झाल्याने परिसरात तिचे कौतुक होत आहे. तिच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष निलेश परब, शालेय समिती अध्यक्ष हेमंत कामत, संस्थाचालक, मुख्याध्यापक सदाशिव धुपकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
फोटो——
मयुरी आरोसकर
