भाजप नेते विशाल परब : आजगाव केंद्र शाळेचा शतक उत्तर सुवर्ण महोत्सव साजरा
⚡वेंगुर्ले ,ता.२५-: आजगाव शाळेच्या विकासासाठी आवश्यक असलेले सर्वतोपरी सहकार्य निश्चितच केले जाईल, असे आश्वासन युवा उद्योजक तथा भाजप नेते विशाल परब यांनी आज या ठिकाणी दिले. दरम्यान विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करून शाळेचे नाव उंचावर न्यावे, असेही त्यांनी सांगितले. केंद्र शाळा आजगाव नं. १ या शाळेचा शतक उत्तर सुवर्ण महोत्सव आज संपन्न झाला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्री. परब बोलत होते.
यावेळी उद्योजक रघुवीर मंत्री, सामाजिक कार्यकर्ते अण्णा झाटये आदी मान्यवर उपस्थित होते.
