वेंगुर्ल्यात नाताळ सण उत्साहात

⚡वेंगुर्ला ता.२५-: येशु ख्रिस्ताचा जन्मसोहळा तालुक्यातील ख्रिस्ती समाजाने मोठ्या उत्साहात साजरा केला. वेंगुर्ला येथील चर्चमध्ये दि.२४ रोजी रात्री व दि. २५ रोजी सकाळी आयोजित केलेल्या प्रार्थनेला बहुसंख्य ख्रिस्ती समाज उपस्थित होता.

  नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला शहरासह अन्य गावांमधील चर्च या धार्मिक स्थळावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच ख्रिस्ती समाजाने आपल्या घरांच्या समोरही चांदणी, विद्युत रोषणाई केली आहे. काहींनी सार्वजनिक ठिकाणी तर काहींनी आपल्या घरामध्ये येशु जन्माचे देखावे साकारले आहेत. आज चर्चमध्ये प्रार्थना पार पडल्यानंतर ख्रिस्ती बांधव आणि भगिनिनी एकमेकांना नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या.
You cannot copy content of this page