⚡वेंगुर्ला ता.२५-: शालेय विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची आवड आणि गोडी निर्माण होण्यासाठी राष्ट्रीय गणित दिनाचे औचित्य साधून गणित विषय विद्यार्थ्यांना सोपा जाण्यासाठी तसेच सुलभ पद्धतीने पाढे पाठ होण्यासाठी दाभोली इंग्लिश स्कूलमध्ये संगीताच्या तालावर पाढे पाठांतर करण्यात आले.
मुख्याध्यापक किशोर सोनसुरकर यांच्या संकल्पेतून पार पडलेल्या या उपक्रमावेळी गणित विभाग प्रमुख वसंत पोवार यांनी डॉ.श्रीनिवास रामानुज यांच्याबद्दल माहिती सांगून या दिवसाचे महत्त्व सांगितले. यावेळी रेश्मा चोडणकर, अश्विनी कांबळे, दिपक पाटील उपस्थित होते.
